सगळ्यांना माहित आहे कि अमोल गुप्ते हा 'तारे जमीन पर' चा सर्वेसर्वा होता. पण आमीर खान त्यात बराच भाव खाऊन निघाला, शेवटी आमीर खानच हो तो. पण बहुतेक ती बाब अमोल गुप्ते ने फारच मनाला लाऊन घेतली आणि दुसरा एक नवीन चित्रपट काढायचा ठरवला. त्याने चित्रपट काढला तर खरा पण 'नवीन' चित्रपट काढायचा विसरला असे Stanley Ka Dabba पाहिल्यावर जाणवले.
"If you want to watch the same movie but without me and with no fun go watch 'Stanley Ka Dabba'. But Shhhh keep it as a secret."
"You will also get to see me as a Teacher and my very big.... huge.... heart! (Don't think otherwise you dirty fellow)"
या चित्रपटात नवीन असे काहीच नाही. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यात मनोरंजन नाही.(हिंदी चित्रपटश्रुष्टीत तश्या नवीन गोष्टी फारच कमी पाहायला मिळतात. पण त्या थोड्याफार मनोरंजक तरी असतात.) अमोल गुप्ते आणि 'लहान मुलान्भोवाताली फिरणारे चित्रपट' हे जणू काही एक समीकरणच बनले आहे. गुप्ते ला कोणीतरी त्याचाच 'कमीने' पुन्हा एकदा दाखवायची गरज आहे.
"I get what I wan't bitch! Even if it's just a dabba..."
'Stanley Ka Dabba' आणि 'तारे जमीन पण' मध्ये जितके साधर्म्य आहे तितके ह्रितिक रोषण आणि हर्मन बावेजा मध्ये आहे. हे काही वेगळे सांगायला नको कि Stanley Ka Dabba हा हार्मेन बावेजा आहे. पण हार्मेन बावेजा कडे त्याच्या पिताश्रींच्या कृपेमुळे बरेच पैसे आहेत. पण 'Stanley Ka Dabba' एकदम गरीब शेंबडे पोर आहे.
"I can still kick Harman Baweja's ass, with my cuteness."
"I would like to see you try."
"No wait... don't show them the 'Victory' poster... It makes me look like an idiot."