Saturday, June 4, 2011

Ready - हं घण्टा

मित्रानो हाथ जोडून एकच विनंती आहे कि Ready चुकूनही पाहू नका. मी पहिला आणि फसलो. अनीस बाझ्मी ला माझे ७० रुपये पचणार नाहीत. ते जसे च्या तसे चोरी होणारेत त्याच्याकडून. चोरी नाही झाले तर incometax वाले त्याच्या घरी धाड घालून ते पैसे घेऊन जातील. जर त्या पैश्याचे त्याने काही खाल्ले तर त्याला असे जुलाब होतील कि ज्वालामुखी त्यासमोर लाजेल . जर कपडे घेतले तर 'नको तिथे' फाटणार आहेत. जर नाडा घेतला तर सगळ्या लोकांसमोर त्याच्या चड्डी खाली येणार आहे. जर सुई घेतली तर ती त्याच्या मागच्या खिश्यात तशीच विसरणार आहे आणि तो खाली बसल्यावर त्याला त्याची 'चांगलीच' जाणीव होणार आहे. जर त्याने chocolate घेतले तर wrapper काढल्या काढल्या ते लगेच खाली धुळीत पडणार आहे. जर chain घेऊन pant ला लावली तर ती ऐनवेळी स्लीप होणार आहे. जर गुलाबाचे फूल घेतले तर तो त्या काटेरी फुलावर चुकून बसणार आहे(जेव्हा त्याने फक्त आणि फक्त  underwear घातलेली असेल तेव्हा). जर मक्याचे कणीस घेऊन खाल्ले तर त्या मक्याचे दाणे त्याला दुसऱ्यादिवशी सकाळी-सकाळी संडासात जशाच्या तसे दिसणार आहेत(एकही न पचता). जर cigarette घेऊन फुकली तर तीच त्याच्या भावी cancer चे कारण ठरणार आहे. जर खोबरेल तेल घेतले तर लावल्या लावल्या तो लगेच टकला बनणार आहे. जर गोरा होण्या साठी fair and lovely घेऊन तोंडाला फासली तर लगेच तो डांबर बनणार आहे. जर त्याच्या कुत्राला biscuit खाऊ घातले त्या पैश्याचे तर कुत्रा लगेच त्याच्या पार्श्वभागाचा कडकडून चावा घेणार आहे. जर एखाद्या वेश्येला दिले तर तो हिजडा निघणार आहे(जे कि त्याला 'दुसऱ्या' दिवशी सकाळी कळेल).

"७० रुपये मिळाले, धन्यवाद."


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...