पिक्चर मध्ये पाहण्यासारख्या गोष्टी : मकरंद अनासपुरे आणि त्याची चड्डी.
पिक्चर मध्ये न पाहण्यासारख्या गोष्टी : उरलेला सगळा पिक्चर.
अनासपुरेने दाखवून दिले कि दादा कोंडके नंतर चड्डी घालावी तर त्यानेच. बाकी कोणी कॅमेऱ्यासमोर चड्डीमधे दिसला कि त्याला पोकळ बांबूचे फटके ओढायची शिक्षा व्हायला हवी. अशी घोडचूक करणाऱ्याला फक्त बांबूच्या फटक्यांनी काही होणार नाही तर त्यांच्या तोंडाला अनासपुरेच्या काळ्या चड्डीपेक्ष्या थोडे कमी काळे फासायला हवे. त्याच चड्डीच्या नाड्याने अशा माणसास उलटे लटकावून मिरचीची धुरी द्यायला हवी.यापुढे मराठी चित्रपट सृष्टीत कुणाचेही बाहू(आणि पायही) फुरफुरायला नकोत चड्डी घालण्यासाठी. चड्डीच नाव काढले कि भल्याभल्यांची पिवळी व्हायला हवी - प्यांट(कारण चड्डी तर त्यांनी घालायचा प्रश्नच येत नाही)
मकरंद अनासपुरेने फक्त ती काळी कुळकुळीत चड्डीच अजरामर नाही केली तर सोबत एक guitar पण आहे. आता guitar न वापरण्याची कुणाला ताकीद द्यायची काही एक गरज नाही. guitar चं काय घेऊन बसलात हो, चड्डीला धरा! guitar वाजवणारे आणि ते कॅमेऱ्यासमोर वाजवायचं नाटक करणारे हजार असतील, पण तीच guitar चड्डी घालून खास बीडच्या इष्टाइलने नाचायला काय उठसुठ कोणालाही जमणार आहे का? हि काय भाजी खायची गोष्ट आहे का? अशा वेळी साक्षात रजनीकांत ज्या ज्वालामुखीवर थंडीमध्ये हात शेकतो त्याच ज्वालामुखीवर पापड भाजणारा अनासपुरेच पाहिजे. येरागाबाळाचे काय काम!
No comments:
Post a Comment