Wednesday, August 31, 2011

B.ö.d.y.g.ü.ä.r.d - आचरटपनाचा कळस


सलमान खानचा आणखी एक अति-सुमार चित्रपट. रेडी पाहिल्यावर माझ्या बाळबोध मनाला असे कधीही वाटले नव्हते कि या पेक्ष्या फालतू दर्जाचा चित्रपट कधी कोणी काढू शकेल. पण तरीपण एक मिणमिणती आशा होती कि जरी तो निघाला तरी त्यात सलमान खानच काम करू शकतो. सलमान खानशी सुमार चित्रपटाचा नायक बनण्यामध्ये स्पर्धा फक्त सलमानच करू शकतो. आणि मला आनंदाने सांगावेसे वाटते कि माझा अंदाज पूर्णपणे बरोबर निघाला. सलमान खानलाही मानायला पाहिजे. एवढ्या मोठ्या फालतुगिरी मध्ये सहभागी व्हायचे असेल तर माणूस एका वेगळ्याच पातळीवर असायला हवा. Ready आणि Bodyguard पाहिल्यावर मी ठामपणे सांगू शकतो कि सलमानने ती पातळी घातली आहे.

आणि या चित्रपटाची काय महती वर्णावी. अहाहा काय ती कथा! जर मी म्हटले लहानपणी कोणी डोक्यावर आपटल्यावर असा काही लिहू शकतो तर ज्यांच्या सोबत खरच काही घडला च्यांचा अपमान होईल. एवढ्या भंकस कथा ज्याच्या डोक्यातून निघाली तो पण सलमान सोबत त्याच वेगळ्या पातळीवर पोहोचलेला आहे.

या चित्रपटाचा शेवट ज्याला आवडला त्याने मला खरच भेटावे हि माझी नम्र विनंती आहे. मला काही त्याच्याशी हातापाई नाही करायची, उलट मला त्या माणसाचा शाल आणि श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करायचा आहे. मी अक्ख्या जगासमोर ओरडून सांगायला तयार आहे कि तो माणूस किती महान आहे. मी माझे पदारून पैसे खर्चून त्याचे मोठे मोठे फलक पूर्ण भारतभर लावीन. सगळ्या वाहिन्यांवर त्याच्या मोठेपणाच्या जाहिराती लावेल. वर्तमान पत्र त्याच्या छायाचीत्रानी आणि त्याच्या बुद्धीच्या पातळीच्या कौतुकाने भरवीन. लोकांनाही कळायला हवं असे महाभागही आहेत म्हणून.

मी तर म्हणतो मोठ्या-मोठ्या डिग्र्या मिळवणाऱ्या डॉक्टरांनी अशा लोकांच्या मेंदूवर संशोधन केला तर मानवजातीस उपयुक्त अशी कितीतरी मौल्यवान माहिती हाती लागू शकते. ते संशोधन मानवजातीचा सर्वविनाश टाळण्यासाठी देशादेशातील अणुकरारापेक्ष्या जास्ती प्रभावी ठरेल.

मला वाटते अक्षय कुमारने आता थोडा घाबरायची गरज आहे. तो तर बकवास चित्रपटांचा बादशाह आहे. पण सलमान हि त्याला दाखवून देत आहे कि तो पण काही कच्च्या गुरूचा चेला नाही. अक्षयचे चित्रपट पाहणे लोकांनी कधीच बंद केले आहे म्हणून काही अक्षय ने गहाळ राहून नये. लोकांना लवकरच समाज येईल कि सलमान पण त्याच्याच मार्गावर जातोय. सध्या गाफील लोक(माझ्यासारखे) सलमान चे चित्रपट पाहत आहेत. पण ती वेळ दूर नाही जेव्हा सलमान ने गाठलेली पातळी सगळ्यांच्या लक्ष्यात येईल.

1 comment:

  1. मी तर म्हणतो मोठ्या-मोठ्या डिग्र्या मिळवणाऱ्या डॉक्टरांनी अशा लोकांच्या मेंदूवर संशोधन केला तर मानवजातीस उपयुक्त अशी कितीतरी मौल्यवान माहिती हाती लागू शकते. ते संशोधन मानवजातीचा सर्वविनाश टाळण्यासाठी देशादेशातील अणुकरारापेक्ष्या जास्ती प्रभावी ठरेल..........................This 1 is awesome...

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...